आज पुन्हा ३ महिन्यांनी blog लिहायला घेतला आहे. हे ३ महिने meditation practice च्या दृष्टीने नेहमी सारखेच गेले. म्हणजे कधी खूप चांगले, कधी खूप वाईट, कधी सामान्य. ह्या ३ महिन्यात ज्ञानात नवी भर पडली, ती म्हणजे आपला मूड , भावना या आपल्या मेंदूत किंवा शरीरात निर्माण होणाऱ्या chemical/ hormones वर अवलंबून असतात. म्हणजे chemical लोच्या ही संकल्पना खरी आहे तर. आणि हे सारखे बदलत असते त्यामुळे कधी आपण एकदम उत्साहात असतो तर कधी एकदम निराश. Meditation practice मुळे हे बदल मला प्रत्यक्ष जाणवले. एखादा दिवस आपल्याला खूप positive वाटत असते तर कधी खूप negative. दिवस सुद्धा नाही तर तासाभरात सुद्धा हे चक्र बदलते. आणि त्यापेक्षाही जाणवलेली/ समजलेली  गोष्ट म्हणजे आपण सजगपणे, जाणीवपूर्वक हे बदल घडवू शकतो. म्हणजे जसा आपला मूड chemical/ hormone वर अवलंबून असतो तसेच आपण जाणीवपूर्वक कृती केली तर हे chemical/hormone तयार होत असावेत. माझ्या साठी हे खूप मोठे realisation होते. आपण आपल्या मूड्स चे गुलाम नाही तर आपण हवा तसा मूड बनवू शकतो हे मला meditation practice मुळे जाणवले.

माझ्या serious practice ला आता ९ महिने होऊन गेले आहेत, त्यामुळे as accountant ह्या कालावधीचा हिशोब मांडणे गरजेचे आहे. काय मिळाले मला ह्या ९ महिन्यात. खूप काही. सर्वात महत्वाचे म्हणजे शारीरिक पातळीवर माझे सतत होणारे आजार खूप प्रमाणात कमी झाले. Acidity, अपचन, भूक न लागणे, बाहेरचे काही खाल्ले कि त्रास होणे बऱ्याच प्रमाणात कमी झाले. मला migraine चा त्रास सुरु झाला होता. जे migraine patient आहेत त्यांना माहित असेल कि काय भयानक वेदना होतात ते. गेल्या ६ महिन्यात एकदाही मला त्याची गोळी घ्यावी लागली नाही. माझ्यासाठी ही प्रचंड achievement आहे. औषध, व्यायाम, आहार याचाही महत्वाचा भाग आहे पण ते सर्व follow करायला meditation चा खूप उपयोग होतो.

मानसिक पातळी वर तर एक वेगळेच आयुष्य जगतोय असे वाटते. खूप relax, शांत वाटते. अस्वस्थपणा, निराशा ही अधून मधून येत असते पण जाणीव असते की हे सर्व तात्कालिक आहे. सगळ्या भावना म्हणजे आपल्या मनाचे खेळ आहेत आणि त्यात किती वाहून जायचे ह्याची जाणीव वाढली. Thoughts are not facts याची प्रत्यक्ष अनुभूती यायला लागली. Traffic, राजकारण यासारख्या विषयावरून होणारी चीड चीड खूप कमी झाली. (हि सर्व माझी मते आहेत). एखादी गोष्ट १००% लक्ष देऊन करायची ह्यामध्ये ऐकण्या च्या कृती मध्ये चांगली सुधारणा झाली. त्यामुळे आई, वडिल, मुलगा या बरोबरचा संवाद चांगलाच सुधारला. यामध्ये बायको यायला अजून थोडा वेळ जावा लागेल असे वाटते. घरातील वादविवाद बऱ्याच प्रमाणात कमी झाले. याचा अर्थ आता सर्व आबादीआबाद झाले, आता भांडणे संपली, आजार संपले असा नाही. ही जाणीव आहे की ही सुरुवात आहे. पण सुरुवातीच्या दृष्टीने हे result encouraging आहेत.

आपण सर्वांनी meditation शिकले पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे. मी मुद्दाम meditation असा शब्द वापरतो आहे, ध्यान नाही. कारण ध्यान म्हंटले की बुवा/ बाबा काहीतरी गूढ असे आपल्याकडे वाटते. माझ्या दृष्टीने meditation ही एक शास्त्रशुद्ध कृती आहे. त्याचा वापर सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका होण्यासाठी करायचा, ते करताना अध्यात्मिक प्रगती झाली तर चांगलेच.

आजची आपली जीवनशैली खूपच विचित्र झाली आहे. भारतासारख्या देशात आपल्याला सूर्यप्रकाशाची कमतरता भासते. D vitamin ची कमी एखाद्या साथी सारखी पसरत आहे. मी वर उल्लेख केलेली chemical/ hormone वाढविण्यासाठी सूर्यप्रकाश खूप उपयोगी असतो पण आपण उन्हात जात नाही. आपल्याला शुद्ध हवा मिळत नाही. आपण खाणे चुकीचे, चुकीच्या वेळी खातो. नवीन नवीन होणाऱ्या सुधारणा मुळे शारीरिक कष्ट कमी झाले आहेत आणि हे सर्व कमी की काय म्हणून प्रत्येक जण प्रचंड तणावग्रस्त आहे. लहान मुलांपासून आजी आजोबापर्यंत सर्व जण तणावाखाली आहेत. कामाचा तणाव, आर्थिक तणाव, परस्पर संबंधामधील नात्यांचा तणाव, एकटे पणाचा तणाव, प्रत्येक गोष्टी मध्ये स्पर्धा त्याचा तणाव, कमीत कमी वेळात जास्तीतजास्त मिळवण्याचा आणि ते जगाला social media मधून कळवण्याचा तणाव. ह्या सर्व तणावाखाली आपण दबून गेलो आहोत. ह्या सतत च्या तणावामुळे अनेक जीवनशैली शी निगडीत आजारांनी आपण ग्रस्त असतो. Acidity, Indigestion, IBS, Ulcers, Blood Pressure, Diabetes, Cardiac disease हे आजार आता खूप common झाले आहेत. आपल्या ७५ ते ९० % doctor visit ह्या जीवनशैली विषयक आजारांशी संबंधित असतात. आपल्याला वाटत असते की औषध घेऊन आजार बरे होतील पण तसं होत नाही. औषधे वरवरच्या लक्षणावर काम करतात. मूळ प्रश्न तसेच राहतात. आज ३० वर्षावरील ३ पैकी १ माणूस वरीलपैकी १ किवा १ पेक्षा जास्त आजारांनी त्रस्त आहे. हे सर्व कसे बदलणार, यासाठी मनाची सजगता वाढवायला हवी तर आपण सूर्यप्रकाशात जास्त वेळ जाऊ, व्यायाम करू, चांगले खाऊ. तणाव घ्यायचा नाही असे म्हणून तो कमी होत नाही. नुसत्या बौद्धिक पातळीवर काम करून उपयौग नाही. मनाला सतत प्रतिक्रिया द्यायची सवय लागली आहे. मनाप्रमाणे झालं कि खुश व्हायचं आणि सतत त्याचीच अपेक्षा करायची, मनाविरुद्ध झालं कि दु:ख करत राहायचं ही मनाला सवय लागली आहे. गौतम बुद्ध यालाच दु:ख (suffering ) म्हणतात. या दु:खापासून मुक्त व्हायचं तर मनावर काम करायला हवं. Meditation practice हा आपल्या मनाला द्यायचा व्यायाम आहे. Meditation सकाळी २० मिनिट केली की विषय संपला असे होत नाही. खरी practice तर दिवस भर चालू असते. प्रत्येक क्षण सजग राहण्याची संधी असते. ही कुठलीही जादू नाही. सरावाचा प्रश्न आहे. पाश्चात्य देशात या विषयावर खूप संशोधन होत आहे आणि त्यातून मिळणारे result अपेक्षा वाढवणारे आहेत.

आपल्या बदललेल्या जीवनशैली मुळे होणाऱ्या प्रश्नावर meditation practice हा आशेचा किरण आहे. मला याचा नक्कीच उपयोग झाला आहे, तुम्हा सर्वांनी देखील याचा प्रयोग करावा असे वाटते. माझा भाऊ किरण म्हणतो त्याप्रमाणे आपण एखाद्या प्रश्नाकडे नुसते पाहून सोडून देऊ शकतो किंवा आपल्याला जमेल ती कृती करू शकतो. मला वाटते कि meditation practice च्या प्रसारामध्ये आपण काहीतरी केले पाहिजे. इच्छा झाली की मार्ग निघतो. मधुराने तिचा दवाखाना मोठ्या जागी shift केल्यामुळे जुन्या दवाखान्याची जागा रिकामीच होती. एक पर्याय होता की ती भाड्याने द्यायची व चार पैसे मिळवायचे. माझ्या accountant स्वभावाला ते पटणारे होते. पण प्रत्येक गोष्टीत हिशोब केला नाही तरी चालतो हे मनाला पटवून आम्ही तिथे meditation centre चालू करत आहोत. आपल्याला जे काही ज्ञान मिळाले आहे ते इतरांना वाटावे, meditation practice session conduct करावे असा plan आहे. १८ तारखेला दसऱ्याच्या दिवशी पूजा करून सुरवात करायची आहे. तुम्हा सर्वाना आग्रहाचे निमंत्रण आहे. आमच्या ह्या नवीन उपक्रमाला तुम्ही support कराल अशी खात्री आहे.

आज social media मुळे आपण जगाशी २४ तास connected असतो पण स्वतःशी connect करून देण्याचा हा एक प्रयत्न.