कोरोना थोडा आटोक्यात येतोय आणि आता आपण थोडा मोकळा श्वास घेऊ असे वाटत असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागलाय. इतर देशांप्रमाणेच आपल्या देशातही दुसरी लाट येते की काय असं वाटतयं. यासाठी प्राथमिक काळजी घेतलीच पाहिजे म्हणजे Sanitizer, Mask आणि Social distancing. पण याबरोबरच आपण आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढविणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे रोग होऊच नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी आयुर्वेदाने अमृतासमान जो कल्प सांगितला आहे तो म्हणजे च्यवनप्राश.
च्यवनप्राशमध्ये प्रामुख्याने आवळा हा घटक असतो असे आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. आयुर्वेदामध्ये अगदी तो आवळा कसा असावा; तसेच त्यामधील साधारण 36 औषधे व त्याची शास्त्रोक्त पद्धत यांचे सुद्धा सविस्तर वर्णन आले आहे. अशाच शास्त्रोक्त पद्धतीने आमच्या Dynamic Remedies च्या फॅक्टरी मध्ये दरवर्षी च्यवनप्राश तयार केला जातो. आवळा मिळण्याचा काळ हा साधारण दिवाळीपासून जानेवारीपर्यंत असतो. म्हणून च्यवनप्राश  या काळामध्ये बनवला जातो.  आणि तो वर्षभर खाल्ला जाणे अपेक्षित आहे.
आयुर्वेदामध्ये अशी आख्यायिका आहे की च्यवन ऋषींनी हा अवलेह सेवन केल्याने त्यांना पुन्हा तारुण्य प्राप्त झाले. त्यामुळे या औषधास ‘च्यवनप्राश’ असे नाव प्राप्त झाले. हे एक रसायन म्हणून आयुर्वेदात सांगितले आहे. रसायन म्हणजे काय तर आपले आरोग्य टिकवून ठेवते. तसेच अकाली केस पांढरे होऊ न देणे, त्वचेची कांती टिकवून ठेवणे थोडक्यात काय तर तारुण्य टिकवून ठेवणे. च्यवनप्राशने केसांचे व त्वचेचे आरोग्य चांगले टिकून राहते. फुफ्फुसांची ताकद वाढवितो. वाढत्या वयात डोळ्यांची शक्ती देखील कमी होते ती टिकवून ठेवण्यासाठी उत्तम उपयोग होतो.

च्यवनप्राश हा सकाळी अनशापोटी घ्यावा म्हणजे त्याचे फायदे चांगले दिसून येतात. च्यवनप्राश बरोबर दूध घेण्याची गरज नाही.
वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होणाऱ्यांसाठी च्यवनप्राश उत्तम. तसेच यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना त्यामुळे तो फायदेशीर ठरतो. हृदय रुग्णांसाठी देखील च्यवनप्राश हे एक हृदयाला बळ देणारे टॉनिक आहे. तसेच ज्यांच्यामध्ये सतत रक्ताची कमतरता जाणवते, त्यांच्यासाठी च्यवनप्राश रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
आपण हल्ली जे इंटरनेट वर वाचतो, Vit. C, Antioxidants याविषयी. यांचा सर्वात Rich source आवळा आहे. म्हणून गोळ्या घेण्यापेक्षा ज्यावेळी ताजा आवळा असतो तो देखील तुम्ही घेऊ शकता किंवा वर्षभर च्यवनप्राश आहेच. शेवटी ‘जुनं ते सोनं’ त्यामुळे च्यवनप्राश जरी जुना असला तरी त्याचा उत्तम फायदा होताना दिसून येतो.

आपण मेडिकलमध्ये नेहमी टॉनिक (रसायन) बघतो आणि निरनिराळी टॉनिके (रसायन) आपली एनर्जी टिकून ठेवण्यासाठी घेत असतो. च्यवनप्राश घरातील सर्व व्यक्तींसाठी उपयुक्त आणि वर्षभर घेण्यासारखे टॉनिक (रसायन) आहे.   च्यवनप्राशमध्ये तेल, तूप आणि मध हे तीनही पदार्थ असल्याने वात, पित्त व कफ या तीनही दोषांवर उपकारक कार्य दिसून येते व आरोग्याचे संतुलन टिकून राहते.
च्यवनप्राश रोज सकाळी अनशापोटी घ्यावा व त्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये.
धन्यवाद.
www.recovalife.com
www.dynamicremedies.in
8380016116/119

https://dynamicremedies.in/products/chyavanprash