

सितोपला षोडश स्यादष्टौ वंशलोचना |
पिप्पली स्याच्चतुष्कर्षा स्यादेला च द्विकार्षिकी ||
एकः कर्षस्त्वचः कार्यश्चूर्णयेत्सर्वमेकतः |
सितोपलदिकं चूर्णं मधुसर्पियुतं लिहेत् ||
श्वासकासक्षयहरं हस्तपादाड्दाहजित् |
मन्दाग्निं सुप्तजिव्हत्वं पार्श्वशूलमरोचकम् |
ज्वरमूर्ध्वगतं रक्तं पित्तमाशुव्यपोहति || – शारंगधर संहिता
पूर्वीच्या काळी जसा आजीबाईचा बटवा होता आणि त्यामध्ये अशी औषधे असायची जी आपण प्राथमिक उपचार म्हणून करत असू आणि त्याचा फायदाही नक्कीच व्हायचा. तसेच सध्या सितोपलादि चूर्ण हे आपल्या घरात हमखास संग्रही ठेवण्याचे औषध आहे आणि आपल्याला बरेच लोक हल्ली सितोपलादि चूर्ण संग्रही ठेवताना दिसतात. फक्त एकच सांगावेसे वाटते हे सितोपलादी चूर्ण उत्तम क्वालिटीचे असावे; तर त्याचे फायदे लवकर दिसून येतात. नाहीतर आयुर्वेदिक औषधांचा फायदा होत नाही किंवा उशिरा होतो असे लोक म्हणतात.
सितोपलादि चूर्णाचा प्रामुख्याने सर्व वयाच्या लोकांमध्ये सर्दी-खोकला, बारीक ताप यामध्ये मुख्यतः फायदा दिसून येतो. सितोपलादि चूर्णाचे मधाबरोबर चाटण तयार करावे आणि दिवसातून तीन-चार वेळा घ्यावे. ज्यावेळी हवामान बदलामुळे, पावसात भिजल्याने किंवा इतर काही कारणांनी Allergic सर्दी-खोकला होतो, त्यावेळी हे उपयुक्त ठरते. Sinusitis मध्ये कोमट पाण्यातून दिवसातून दोन-तीन वेळा सितोपलादि चूर्ण घ्यावे.
सामान्यतः जे कफाचे आजार आहेत म्हणजे सर्दी-खोकला, दम लागणे इत्यादी मध्ये आयुर्वेदिक औषधे वापरल्यास उष्ण पडतात अशी बऱ्याच रुग्णाची तक्रार येते. पण सितोपलादि चूर्ण हे त्याला अपवाद आहे. त्यामधील औषधांच्या परस्पर प्रमाणामुळे कफाबरोबर पित्ताचे देखील शमन होते. ज्यांना हातापायांची आग होते त्यांनी सितोपलादि चूर्ण तुपासह घ्यावे.
लहान मुले अनेकदा सारखी किरकिर करतात. काहीच नीट खात नाही, सर्दीमुळे नाक वाहत असते अशावेळी सितोपलादि चूर्णाचा मधाबरोबर अतिशय उत्तम फायदा होताना दिसून येतो. ज्यांना अग्निमांद्य असते म्हणजेच कधीच भूक लागत नाही, फक्त वेळ झाली म्हणून जेवण करतात अशा वेळीदेखील सितोपलादि चूर्ण तुपासह घेतल्यास अग्निमांद्य दूर होते. तसेच अरुचीसाठी म्हणजे तोंडाला चव नसणे यामध्ये देखील याचा फायदा होतो.
सितोपलादि चूर्णाचा एक वेगळा फायदा म्हणजे यामध्ये खडीसाखर, वेलची, दालचिनी असे आहारीय घटक आहेत. त्यामुळे जास्त काळ सेवन केले तरी शरीरास काहीच अपाय होत नाही.
असे बहुगुणी, बहुपयोगी सितोपलादी चूर्ण नक्कीच घरात ठेवायला पाहिजे. फक्त सितोपलादि चूर्ण खात्रीशीर कंपनीचे सगळ्या घटकांनी युक्त, योग्य प्रमाणात असावे.
[डायनामिक रेमेडीजचे सितोपलादी चूर्ण आहे त्यातील प्रत्येक घटक हा अखंड स्वरूपात खात्रीशीर ठिकाणाहून घेतला जातो. त्यानंतर निवडून शास्त्रात सांगितलेल्या प्रमाणानुसार सगळे घटक एकत्र केले जातात आणि मग त्याचे चूर्ण केले जाते. ही सगळी प्रक्रिया (Process) करताना स्वच्छता आणि सगळे नियम पाळले जातात.]
[अधिक माहितीसाठी संपर्क : 8380016119]