सूर्याची किरणे तप्त होऊन सृष्टीतील स्निग्धता शोषून घ्यायला सुरुवात करून कोरडेपणा जाणवायला लागतो. या काळालाच ग्रीष्म ऋतु असे म्हणतात. या काळामध्ये पचनशक्ती अजून कमी होत जाते. तसेच वातावरणात उष्णता व कोरडेपणा जाणवायला लागतो. यामुळेच उष्णतेचे विविध आजार उद्भवायला लागतात. तसेच शरीरातील बलच स्वाभाविकरित्या कमी व्हायला लागते. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदात ग्रीष्म ऋतुचर्येचे वर्णन आले आहेत त्यात काही नियम सांगितले आहेत.

  • गोड तसेच स्वभावाने थंड पदार्थ सेवन करावेत.
  • स्निग्ध व द्रव पदार्थांचा आहारात समावेश असावा. उदा; ऋतुनुसार उपलब्ध असलेली फळे
  • सारखे गरम-थंड, गरम-थंड खाऊ नये.
  • तूप, दूध, तांदूळ यांचे सेवन करावे.
  • दिवसा घरामध्ये थंड वातावरण निर्मिती करावी. (पंखा, वाळ्याचे पडदे इ. च्या सहाय्याने)
  • उन्हात बाहेर जाताना टोपी/स्कार्फ यांचा वापर करावा. (हल्ली बाजारात वाळ्याची टोपी आहे त्याचा वापर करावा.)
  • उन्हातून फिरून आल्यावर डोक्यावर दुधाच्या घड्या किंवा काकडीचे काप ठेवावेत.
  • अति व्यायाम टाळावा.
  • शरीरावर चंदनाचा लेप करावा.
  • मद्य सेवन अजिबात करू नये व अल्प प्रमाणात केल्यास पाणी जास्त मिसळून प्यावे.
  • आंबट, तिखट व खारट पदार्थांचे सेवन टाळावे.
  • खर्जुरादि मंथ, षडंगोदक सेवन करावे.
  • रात्री झोपताना १ कप दूध + २ चमचे तूप घ्यावे.
  • रात्री झोपताना पायाच्या तळव्याला तेल लावून झोपावे.
  • दिवसा थोडी झोप काढायला काही हरकत नाही. (डायबेटीस व स्थूल व्यक्ति सोडून)

डॉ. सौ. मधुरा भिडे.

8380016116

Dynamic Remedies Pvt. Ltd.